Thursday, May 21, 2020

शब्दात मी, तुमच्यासाठी.......... 
पाऊस आपल्या हातचा नसतो.....
___________________________
अचानक ढग दाटून येतात,
धरणी ओली होते,
अंगावर वारा शहरतो,
पाऊस आपल्या हातचा नसतो......

उन्हात थेंब परतून येतात,
कोकिळा बोलकी होते,
वेळी अवेळी बरसतो,
पाऊस आपल्या हातचा नसतो......

आठवणी ही संगे येतात,
मन पुन्हा झुरते,
बरंच काही सांगून जातो,
पाऊस आपल्या हातचा नसतो....
पाऊस आपल्या हातचा नसतो.....
       -©तुळजाप्रसाद धानोरकर
          आसिस्टंट मॅनेजर
          कोटक महिंद्रा बँक,पुणे.

निसर्ग आणि मी

 
 
 
 
 
 

आज सकाळी  अचानक गावातील ( महादेव माळ) येथे जाण्याचा योग आला,

खरचं...
निसर्ग किती सुंदर आहे,खूप काही बोलतो अहो तो  माणसाशी एकांतात,

जणू त्यानं हिरव्या शाहीने एक काव्यच लिहिलं असावं
पण मनुष्याने मात्र निसर्गाचं काही वेगळचं करून ठेवलंय....

असो,

 खूप बरं वाटत होतं आज मोकळा श्वास घेताना....

निसर्ग व त्या सोबतची  मी अनुभवलेली अप्रतिम सुंदरता,माझ्या छायाचित्रात कैद करून आपल्या सोबत वाटून घेतोय नक्की पहा.....


तुळजाप्रसाद धानोरकर
आसिस्टंट मॅनेजर
कोटक महिंद्रा बँक,पुणे

Friday, May 15, 2020

नमस्कार,माझ्या प्रिय नात्यांनो...

आज पासून (वेळोवेळी आणि निरंतर)सुरू राहणाऱ्या (शब्दात मी,तुमच्यासाठी....)
चा नवीन प्रयोग त्यात मी माझ्या चार दोन ओळींच्या कविता,व आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा मला आलेला अनुभव आणि त्याने मला दिलेलं शहाणपण तुमच्यासमोर शब्दात मांडत आहे इतकच, माझ्या कवितां,त्यातील शब्द,वाचक रसिकांना नेहमी आवडले आहेत,त्यांची कौतुकास्पद दाद नेहमी मला भेटली आहे,आशा करतो की हा ही नवीन प्रयोग आपणा सर्वांना नक्की आवडेल...
आपल्यासमोर सादर करत आहे, 
शब्दात मी तुमच्यासाठी.......

आपलाच,
तुळजाप्रसाद धानोरकर
असिस्टंट मॅनेजर,
कोटक महिंद्रा बँक,पुणे

Thursday, May 14, 2020


आयुष्यातले काही प्रश्न उत्तराच्या शोधात असतात,
हा खेळ असाच नेहमी चालत राहतो, असो......
माझ्या शब्दरचनेतून सादर करतोय.......

आहे उत्तर?हाच प्रश्न आहे...   
-------------------------------------
मावळता सूर्यास्त पाहून
एक हुरहूरणारं काळीज..
मुक्काम,हुंदक्याचचं गाव का...
आहे उत्तर?हाच प्रश्न आहे....

दिवसागणिक नव्या स्वप्नाचा थर
एक हुरहूरणारं काळीज..
सावलीतल्या झाडाला,उन्हाचीच आस का...
आहे उत्तर? हाच प्रश्न आहे....

मी एकटाच पुरेसा आहे हो
एक हुरहूरणारं काळीज..
रस्त्याला माझ्या,काट्याचच कुंपण का...
आहे उत्तर? हाच प्रश्न आहे....

प्रश्न प्रश्न उत्तर उत्तर
एक हुरहूरणारं काळीज..
प्रश्नाला आस,उत्तराचीच का...
आहे उत्तर?हाच प्रश्न आहे...   

        ◆शब्दांकन◆
  © तुळजाप्रसाद धानोरकर
       आसिस्टंट मॅनेजर
    कोटक महिंद्रा बँक,पुणे

असे जपलेत आयुष्यातले काही क्षण......









माझ्यावर प्रेम करणाऱ्या बऱ्याच लोकांच्या आग्रहास्तव
तुमच्याचसाठी माझ्या चार दोन ओळींच्या कविता,लवकरच एका नव्या स्वरूपात,

शब्दात मी,
तुमच्यासाठी..... 

यातून
 लवकरच मी आपल्यासमोर घेऊन येत आहे..........
आपले माझ्यावरचे हे प्रेम दिवसागणिक असेच वाढत जावो हीच ईच्छा.........



तुमचाच,
तुळजाप्रसाद धानोरकर
असिस्टंट मॅनेजर,
कोटक महिंद्रा बँक,पुणे